BREAKING NEWS

 • महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी केंद्रांकडून 20 हजार कोटी रुपयांची तरतूद

  •  दि. २१ - महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारने 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून 11 रेल्वे मार्गांचा विकास करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा यांनी आज नाशिक इथं दिली. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील चौथ्या प्लॅटफॉर्मचे उदघाटन तसेच अन्य विकास कामाच्या लोकार्पण सोहळा आज सिन्हा यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.

   गेल्या काही वर्षांत रेल्वे प्रवाशांची आणि माल वाहतुकीची संख्या वाढली , मात्र त्या तुलनेत रेल्वेचा विकास झाला नाही त्यामुळे आता केंद्र सरकारने सव्वा लाख कोटी रुपयांची रेल्वे विकासासाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. असे सांगून सिन्हा यांनी महाराष्ट्रात नवीन नाशिक पुणे रेल्वे मार्ग तसेच मनमाड-मालेगाव- इंदूर मार्गाचा तसेच मनमाड - दौड रेल्वे मार्गाचा विकास करण्यात येईल असं त्यांनी सांगितले. केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे राज्यमंत्री महाराष्ट्रातील रेल्वे विकासाचा अनुशेष भरून काढत असल्याचं सांगितलं यावेळी आमदार योगेश घोलप यांच्यासह रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

  •  
   
   
   

  21 Aug 2016
 • आम्ही जात-पात मानत नाही पण धर्म मानतो - उद्धव ठाकरे

  पुणे, दि. २१ : आम्ही जात-पात मानत नाही पण धर्म मानतो, अधर्म होऊ नये यासाठी धर्माचे आचरण महत्वाचे असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यात केले आहे. डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सप्तर्षी यांचा गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नरेंद्र चपळगावकर, गिरीष बापट यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांची उपस्थिती होती. सप्तर्षी यांनी सत्ताधाऱयांचे कोडकौतुक केले नाही, तसे केले असते तर आत्तापर्यंत राज्यपाल झाले असते असेही ते म्हणाले.

  21 Aug 2016
 • वेगाचा बादशहा उसैन बोल्टला बनायचं होत क्रिकेटर पण तो बनला धावपटू

  मुंबई, दि. २१ : किराणा दुकानात बसणं, फावल्या वेळात क्रिकेट एके क्रिकेट खेळणं. आयुष्याचं ध्येय काय? तर वकार युनुससारखी बॉलिंग जमायला हवी. पाकिस्तान ही त्याची फेव्हरिट क्रिकेट टीम. अन् फास्ट बॉलर व्हायचं हे स्वप्न. सचिन तेंडुलकर अन ख्रिस गेल हे दोघे आवडते क्रिकेटपटू. गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर खेळायचा अन् फास्ट बॉलिंग करायचा.

  फुटबॉलही त्याचा जीव की प्राण. आजही त्याला कोणी जर फुटबॉलची ऑफर केली तर तो नाही म्हणू शकणार नाही. पण तो बनला धावपटू. सगळ्या आवडी बाजूला ठेवून वेगळ्याच क्षेत्रात करिअर घडवलं. तेही इतक्या टोकाचं की तो जगातला सर्वांत वेगवान धावपटू बनला. हा धावपटू म्हणजे नेहमी नवे विक्रम प्रस्थापित करणारा जमैकाचा उसैन बोल्ट.

   

   

  21 Aug 2016
 • पाकव्याप्त काश्मीरही भारताचेच, मोदींची गर्जना

  पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू काश्मीरचा भाग आहे म्हणूनच पाकव्याप्त काश्मीर हे भारताचेच आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले आहे. शुक्रवारी काश्मीरप्रश्नी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली त्यावेळी मोदी बोलत होते. यापुढे देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली जाणार नाही असेही ते म्हणाले. तसेच मनात असंतोष खदखदत असलेल्या काश्मीरी नागरिकांचा विश्वास आपल्याला जिंकायला पाहिजे असे आवाहनही त्यांनी बैठकित बोलताना केले. गेल्या महिन्याभरापासून जम्मू काश्मीरमध्ये जे असंतोषाचे वातावरण आहे त्याबद्दल मला दु:ख आहे आणि येथील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करेल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
  काश्मीर प्रश्नाविषयी सगळ्याच पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवला याबद्दल त्यांनी सगळ्यांचे आभार मानले. पाकिस्तानच या अशांततेच मूळ कारण आहे असे म्हणत मोदी यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवरही टीका केली. काश्मीरमधल्या प्रश्नावर लवकरच मार्ग काढला जाईल आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणी मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचाराचे वातावरण आहे. नागरिकांकडून अनेक ठिकाणी हल्ले केले जात आहेत. गेल्या महिनाभरापासून काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जमावाचे हल्ले थोपवण्यासाठी अतिरिक्त सेनाही काश्मीर खो-यात तैनात करण्यात आली आहे. या हिंसाचारात गेल्या महिनाभरापासून ४ हजारांहून अधिक सैनिक तर साडेतीन हजारांहून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिली. त्यामुळे काश्मीरच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती.

  12 Aug 2016
 • अकोल्यात फडकणार १०० फूट लांबीचा ध्वज

  शिवसंग्राम आणि शिव हेल्थ क्लबचा अनोखा उपक्रम

  सचिन राऊत

  ऑनलाइन लोकमत

  अकोला, दि. ६ - शहरातील सर्वात मोठी दहीहंडी असो किंवा आगळे-वेगळे आंदोलने असो यामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या शिवसंग्रामचे नेते तथा शिव हेल्थ क्लबचे अध्यक्ष शिवा मोहोड यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी आणखी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदीनी तुकाराम चौकातील शिव हेल्थ क्लबवर तब्बल १०० फुट कापडाचे ध्वजारोहणाचा अभूतपूर्व सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

  शिवसंग्राम आणि शिव हेल्थ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १५ आॅगस्ट रोजी सकाळी शिव हेल्थ क्लब येथे १०० फुट कापडाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यासाठी १०० फुटांचा तीन रंगाच्या कापडावर कामकाज करण्यात येत आहे. शिवा मोहोड यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात येत असलेल्या या अनोख्या ध्वजारोहन सोहळयाला सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण, जलसंपदा खात्याचे कार्यकारी अभियंता लोळे, खदान पोलिस स्टेशनचे ठानेदार छगनराव इंगळे विशेष उपस्थिीतीत राहणार आहे. स्वातंत्र्य दिनाचा हा उत्सव शिव हेल्थ क्लबवर अनोख्या आणि आगळया वेगळया पध्दतीने साजरा करण्यात येणार असून यासाठी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिव हेल्थ क्लबचे अध्यक्ष शिवा मोहोड यांनी केले आहे. १०० फुटांच्या कापडावर दोन टेलर दिवसरात्र काम करीत असून ज्या ठिकाणी हा ध्वज फडकविण्यात येणार आहे त्या ठिकाणी आवश्यक ती सुवीधा उपलब्ध करण्यात येत आहे. या ध्वजासाठी मोठा खांब तयार करण्यात येत असून यावर हा तिरंगा मोठया दिमाखात फडकणार आहे. शिवा मोहोड यांच्या या उपक्रमाची माहिती परिसरात पसरल्यानंतर हा ध्वज पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

   

  06 Aug 2016
 • PM Narendra Modi in ‘top 10 criminals’: Internet giant Google gets court notice

  A Times of India report said on Wednesday that the court has also directed concerned authorities to register a criminal complaint case against Google and its top executives.

  31 Jul 2016
 • खडसेंच्या चौकशीला या आठवड्यापासून सुरुवात

  • रविभवनात होणार कामकाज : राजकीय भवितव्यावर होणार निर्णय

   नागपूर : राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुंबाने भोसरी (जि. पुणे) येथील एमआयडीसीत केलेल्या भूखंड खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे आरोप लावण्यात आले होते. या खरेदी प्रकरणाची चौकशी नागपुरात होणार असून सेवानिवृत्त न्यायाधीश डी.एस.झोटिंग यांच्या अध्यक्षतेत चौकशीच्या कामाला या आठवड्यापासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. हा चौकशी अहवाल खडसे यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा राहणार आहे.

   राज्य मंत्रिमंडळात काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या क्रमांकाचे प्रभावी मंत्री असलेल्या खडसे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील ‘एमआयडीसी’तील जमीन खरेदी व्यवहारात गैरप्रकार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. यानंतर खडसे यांना पदाचा राजीनामादेखील द्यावा लागला. या जमीन व्यवहाराची न्यायालयीन चौकशी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती डी. एस. झोटिंग करणार आहेत.

   डी. एस. झोटिंग हे नागपूरचेच असल्यामुळे चौकशीचे कामकाज रविभवन येथील कॉटेज क्रमांक १३ येथूनच चालणार आहे. यासाठी सर्व प्रशासकीय तयारी सुरू असून आवश्यक त्या सर्व सुविधा येथे पुरविण्यात येणार आहेत. या जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का, ही जमीन एमआयडीसी कायदा वा महसूलविषयक विविध अधिनियमान्वये हस्तांतरणीय किंवा विक्रीपात्र होती का, याची चौकशी करण्यात येईल. तसेच खडसे यांनी मंत्रिपदाचा वापर या जमीन खरेदी व्यवहारात केला काय (कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट), याचीही चौकशी केली जाईल. (प्रतिनिधी)

    

   खडसेंनादेखील बोलावण्याची शक्यता

   संबंधित जमीन व्यवहाराबाबत झालेले आरोप-प्रत्यारोप, विद्यमान व तत्कालीन अधिकाऱ्यांसह सर्व संबंधितांची येथे सुनावणी होणार आहे. संबंधित जमीन मूळ मालकाकडेच होती आणि त्याच्याशी खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला होता, असा दावा खडसे यांनी केला होता. त्यामुळे खडसे यांनादेखील चौकशीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    

    

   
   
  Your Comments

  26 Jul 2016
 • Sheena Bora case: 'Spiderman' Sanjeev Khanna's bail to be decided on July 29

  Sheena Bora case: 'Spiderman' Sanjeev Khanna's bail to be decided on July 29

   
   

  26 Jul 2016
 • मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण कार अपघातात 6 जण ठार

  लोणावळा, दि. 26 - मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कामशेतजवळ भिषण अपघात झाला आहे. पवना पोलीस चौकीजवळ झालेल्या भीषण कार अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी  पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगात जात असताना कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की 6 जणांचा मृत्यु झाला आहे. 
   
  कामशेत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास MH 14 EU 7038 क्रमांकाची मारुती सुझुकी सियाज कार कामशेत हद्दीत भरधाव वेगात जात होती. यावेळी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
   
  अपघातात मृत पावलेले सर्व जण पुण्यातील बावधन येथील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं असल्याची माहिती कामशेत पोलिसांनी दिली आहे. मयत व जखमी साधारण २५ ते २८ वयोगटातील आहेत. धायरीच्या सिंहगड कॉलेजचे हे सर्व विद्यार्थी असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. कामशेतचे पोलीस निरीक्षक आय.एस. पाटील पुढील तपास करत आहेत.
  मृतांची ओळख पटली असून आदित्य भंडारकर, यश सिराली, अभिषेक रॉय, अक्षय भिलारे आणि जॉकी सैमुअल अशी त्यांची नावे आहेत.

  26 Jul 2016

News India